ही यंत्रणा:
जास्त प्रमाणात शुद्ध पाणी तयार करण्यास सक्षम
बॅक्टेरिया, केमिकल्स, व दुर्गंधी युक्त घटकांचा शुद्धीकरणासाठी प्रभावी
सतत आणि अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करणारी
या यंत्रणेमुळे गावातील नागरिकांना अत्यंत स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, पाणीजन्य आजारांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन व आरोग्य हमी कार्यक्रमांशी सुसंगत अशी ही सुविधा गावाच्या विकासामध्ये एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.