वाखारी / भिलवाड ग्रामपंचायत

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

अहिल्यादेवी नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

वाखरी-भिलवाड ३१ मे २०२५ रोजी वाखरी-भिलवाड येथे अहिल्यादेवी नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.

अहिल्यादेवी नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
अहिल्यादेवी नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
वाखरी-भिलवाड येथे दिनांक ३१ मे २०२५ रोजी अहिल्यादेवी नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व महिला स्वावलंबन क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना प्रशस्तिपत्र, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, महिला बचतगट व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमामुळे गावातील महिलांना आत्मविश्वास व प्रेरणा मिळाली असून भविष्यातील पिढ्यांसाठी हा सोहळा आदर्श ठरला आहे.