कार्यक्रमाची सुरुवात परंपरागत वाद्यांच्या गजरात आणि आदिवासी नृत्याने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीवर आधारित नाटिका, गीतं, भाषणं व नृत्य सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाची माहिती दिली आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपक्रमांवर प्रकाश टाकला.
ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक शाळा, ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या उपक्रमामधून समाजातील समता, एकता आणि आदिवासी समाजप्रती आदरभावना वृद्धिंगत झाली.